Wednesday, January 25, 2017

रिपब्लिक डे 2017

रिपब्लिक डे 2017: का साजरी केलं जातं भारतीय प्रजासत्ताक दिन?

 
भारतीय प्रजासत्ताक दिन
देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी जानेवारी 26 रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते.
26 जानेवारी इतिहासात यासाठी महत्वपूर्ण आहे कारण भारताचं संविधान याच दिवशी अस्तित्वात आले आणि भारत एक गणतंत्र देश बनले. भारताचे संविधान लिहले गेलेलं सर्वात मोठ संविधान आहे. संविधान निर्माण प्रक्रिया 2 वर्षे, 11 महिने व 18 दिवस लागले.
भारतीय संविधानाचे वास्तुकर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी विश्वातील अनेक चांगला संविधानातुन चांगले लक्षणे यात आत्मसाद केले. भारताची राज्यघटना समितीने 26 नोव्हेंबर, इ.स. 1949 रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. 1950 रोजी अंमलात आली.
जवाहरलाल नेहरूंनी 26 जानेवारी इ.स. 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.26 जानेवारी, इ.स. 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. याच दिवशी देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी शवथ ग्रहण केलं होतं.

काय काय होत या दिवशी

प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवस: ऑगस्ट १५ व गांधी जयंती: ऑक्टोबर २). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोड दळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

उत्सव

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात.
तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. अशी साजरी होते भारताचा प्रजासत्ताक दिन.

1 comment:

  1. How to Play Baccarat - WURRIES & MONEY
    Baccarat is a game of luck and luck. This is one of the most popular casino games. Baccarat is a card game that is played by two teams: the one team 에볼루션 바카라 사이트

    ReplyDelete